Surprise Me!

भूयार खोदून बँक लुटणाऱ्या 11 आरोपींना अखेर अटक. पोलिसांच्या अथक प्रयत्नांना यश. | New Mumbai News

2021-09-13 0 Dailymotion

जुईनगरच्या बँक ऑफ बडोदातील दरोडा प्रकरणात अकरा जणांना अटक करण्यात पोलिसांना अखेर यश आलंय. नवी मुंबई पोलिसांनी उत्तर प्रदेशातून या आरोपींना अटक केलीय. गेल्या 13 नोव्हेंबर रोजी चक्क भूयार खोदून हा बँक दरोडा टाकण्यात आला होता. एप्रिल 2017 पासून या बँकेत दरोडा घालण्याचं प्लॅनिंग सुरू होतं. बँकेत भुयार खोदून आरोपींनी 27 लॉकर फोडले होते. यातून 3 कोटी 43 लाख रुपयांचा मुद्देमाल आरोपींनी चोरून नेला होता. चोरलेल्या मुद्देमालापैकी पोलिसांनी पन्नास टक्के मुद्देमाल जप्त केलाय. अटक केलेल्या आरोपींपैकी पाच जण अट्टल गुन्हेगार असून त्यांच्यावर जवळपास शंभर गुन्ह्यांची नोंद आहे.दरोडेखोरांनी नेमकी किती रक्कम चोरून नेली होती याची माहिती त्यावेळी मिळाली नव्हती. कट रचूनच ही बँक लुटण्यात आली हे समोर आलेल्या पुराव्यांवरून स्पष्ट होत होतेच. त्याच अनुषंगाने नवी मुंबई पोलीस कामाला लागले आणि या सगळ्या प्रकाराला एक महिना उलटायच्या आत बँक लुटणाऱ्या 11 दरोडेखोरांना नवी मुंबई पोलिसांनी गजाआड केले. आता 4 फरार दरोडेखोरांचा शोध सुरू आहे.<br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Buy Now on CodeCanyon